#INDvAFG 3rd T20 : सुपरओव्हरही बरोबरीत, आता पुन्हा 6-6 चेंडूंचा सामना..

India vs Afghanistan 3rd T20 2024, Live Cricket Score : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाने पहिले दोन्ही सामने प्रत्येकी सहा गडी राखून जिंकले. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी-20 सामना बरोबरीत सुटला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला.
सुपर ओव्हरमध्ये काय घडलं…
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 16 धावा करत भारतासमोर विजयासाठी 6 चेंडूत 17 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात शेवटच्या चेंडूवर भारताला 2 धावांची आवश्यकता होती मात्र, एकच धाव घेता आली आणि सुपर ओव्हरही टाय झाली. दोन्ही संघांना सुपरओव्हरमध्ये 16-16 धावा करता आल्या.
𝐓𝐡𝐞 𝐒𝐮𝐩𝐞𝐫 𝐎𝐯𝐞𝐫 𝐡𝐚𝐬 𝐛𝐞𝐞𝐧 𝐭𝐢𝐞𝐝 & 𝐰𝐞 𝐡𝐚𝐯𝐞 𝐚𝐧𝐨𝐭𝐡𝐞𝐫 𝐒𝐮𝐩𝐞𝐫 𝐎𝐯𝐞𝐫 𝐅𝐨𝐥𝐤𝐬! 🤩
Some Scenes in Bengaluru! 👏#AfghanAtalan | #INDvAFG2024 pic.twitter.com/fL0rUEtjoW
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) January 17, 2024
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरही टाय झाली आहे. आता दोघांमध्ये दुहेरी सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे. यावेळी भारतीय संघ पहिले सहा चेंडू खेळणार आहे.
तत्पूर्वी, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी-20 सामना बरोबरीत सुटला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. अफगाणिस्तानला शेवटच्या षटकात विजयासाठी 19 धावा करायच्या होत्या, पण संघाला 18 धावा करता आल्या आणि धावसंख्या बरोबरीची झाली. अफगाणिस्तानला शेवटच्या चेंडूवर तीन धावा करायच्या होत्या, मात्र दोनच धावा करता आल्या.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 212 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघाला 20 षटकात सहा विकेट्सवर 212 धावा करता आल्या आणि सामना टाय झाला. गुलबदिन नायबने 23 चेंडूत नाबाद 55 धावांची तुफानी खेळी केली. भारताकडून वॉशिंग्टन सुंदने सर्वाधिक 3 गडी बाद केले.


