IND vs AFG : गौतम गंभीरने भाकरी फिरवली! तिसऱ्या वनडेआधी ‘या’ खेळाडूला दिले संघात स्थान
भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात सध्या ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात असून या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत एकतर्फी विजय नोंदवला आहे.

IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात सध्या ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात असून या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत एकतर्फी विजय नोंदवला आहे. मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर, आता भारतीय संघाची नजर अफगाणिस्तानचा संपूर्ण सुपडा साफ करून मालिका ३-० ने खिशात घालण्यावर असणार आहे.
मालिकेतील हा तिसरा आणि अंतिम सामना (IND vs AFG) चेन्नईच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र, या अत्यंत महत्त्वाच्या सामन्याच्या अवघ्या एक दिवसाआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने भारतीय संघात एक मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अंतिम सामन्यापूर्वी (IND vs AFG) मध्यमगती वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर करून यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे. हर्षित राणाचा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील रिहॅब म्हणजेच दुखापतीतून सावरण्याचा काळ आता यशस्वीपणे पूर्ण झाला असून तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.

१७ जूनला भारतीय क्रिकेटमध्ये महासण! एकाच दिवशी भारताचे ३ वेगवेगळे संघ वेगवेगळ्या मैदानांवर उतरणार; चाहत्यांना मिळणार क्रिकेटचा ट्रिपल डोस
वास्तविक पाहता हर्षित राणासाठी गेल्या काही महिन्यांचा काळ अत्यंत चढ-उतारांचा राहिला आहे. त्याला यापूर्वी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले होते, मात्र दुर्दैवाने ही मोठी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच तो दुखापतग्रस्त झाला. या गंभीर दुखापतीमुळे त्याला वर्ल्डकप संघातून तर बाहेर व्हावे लागलेच, शिवाय तो आयपीएल स्पर्धेलाही मुकला होता.
आता दुखापतीतून पूर्णपणे सावरल्यानंतर त्याला आगामी आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात आधीच स्थान मिळालेले आहे, परंतु त्या परदेशी दौऱ्यावर जाण्यापूर्वीच तो अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात मैदानात खेळताना दिसू शकतो, ज्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला सराव मिळेल.
भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील हा तिसरा आणि अंतिम वनडे सामना शनिवार, २० जून रोजी चेन्नई येथे खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी १:३० वाजता सुरू होईल, तर सामन्याची नाणेफेक दुपारी १:०० वाजता केली जाईल.
क्रिकेट चाहत्यांना हा रोमांचक सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर लाईव्ह पाहता येणार आहे, तसेच मोबाईल किंवा ओटीटीवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टारवर देखील उपलब्ध असणार आहे. भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून अफगाणिस्तानला व्हाईटवॉश देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
तिसऱ्या वनडे सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, यशस्वी जैस्वाल, हर्षित राणा.





