Ind Squad For 2nd Test : ईशान IN अन् बुमराह OUT, कानपूर कसोटीसाठी बदलणार टीम इंडिया? जाणून घ्या, संभाव्य 15 खेळाडूंची नावे…

Team India Squad For 2nd Test Against Bangladesh at Kanpur : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी बीसीसीआयने अद्याप टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. चेन्नईत खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. ही कसोटी संपल्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर केला जाईल.
रिपोर्टनुसार दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियामध्ये अनेक बदल पाहायला मिळू शकतात. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुसऱ्या कसोटीत विश्रांती दिली जाऊ शकते. चेन्नईत खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडिया तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला आहे. मात्र, कानपूरमध्ये दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकीपटू खेळण्याची शक्यता आहे.
इशान किशनला संधी मिळणार..?
दुलीप ट्रॉफीमध्ये यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने शतक झळकावले. तो जबरदस्त फॉर्मात आहे. याआधी त्याने बुची बाबू स्पर्धेतही शतक झळकावले होते. अशा स्थितीत इशान किशनला दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकते. तो राखीव सलामीवीर म्हणून 15 सदस्यीय संघाचा भाग असू शकतो.
यश दयाल वगळण्याची शक्यता….
चेन्नईत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी बीसीसीआयने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालला प्रथमच संघात स्थान मिळाले. मात्र, आता दुसऱ्या कसोटीसाठी 15 सदस्यीय संघ निवडला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत यश दयाल याला संघातून वगळले जाऊ शकते.
IND vs BAN 1st Test (Day 3 Stumps) : तिसऱ्या दिवशीही भारताचे वर्चस्व, विजयापासून आणखी 6 विकेट्स दूर…
दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संभाव्य 15 सदस्यीय संघ :- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, ईशान किशन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (रिजर्व विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.





