Foreign direct investment: थेट परदेशी गुंतवणुकीत वाढ
Updated On:

foreign direct investment – यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत देशातील थेट परदेशी गुंतवणुकीत अर्थात एफडीआयमध्ये जोरदार वाढ झाली असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 45 टक्क्यांनी वाढून 29 अब्ज डॉलर्सच्या वर गेली आहे.
यावर्षी आलेल्या एफडीआयचा प्रामुख्याने सेवा, संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, दूरसंचार, वाहन, औषधनिर्मिती आणि रसायनं या अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्रांना लाभ झाला.
एफडीआयमध्ये आलेल्या ओघाचा परिणाम गुंतवणुकीत वाढ आणि रोजगार निर्मितीच्या रुपाने दिसून येणार आहे. जुलै ते सप्टेंबर या दुसर्या तिमाहीत एफडीआयमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 43 टक्क्यांनी वाढ झाली असून ती 13 अब्ज डॉलर्सच्या वर गेली आहे.





