एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ; मुख्यमंत्र्यांची परवानगी
Updated On:

मुंबई – एसटी महामंडाळाच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांचा 34 टक्के असलेला महागाई भत्ता 38 टक्के झाला आहे. महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडेल.
दरम्यान, दीड वर्षांपूर्वी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मोठे आंदोलन पुकारले होते. त्यावेळीही एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा अशी मागणी जोर धरत होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महागाई भत्त्याच्या 4 टक्के वाढीला परवानगी देण्यात आली आहे.




