Nagar | विसापूर प्रकल्पाचा कुकडी प्रकल्पात समावेश करा

नगर (प्रतिनिधी) – श्रीगोंदे तालुक्यातील कुकडी मध्यम प्रकल्पाचा कुकडी प्रकल्पामध्ये समावेश करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विसापुर मध्यम प्रकल्प सन १९२० मध्यम प्रकल्प बांधून पूर्ण झाला. पूर्वीच्या काळात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने हंगा नदी पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या पाण्यामुळे विसापुर प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणी साठा होत होता.
आता पाणलोट क्षेत्रात गेल्या शंभर वर्षात अनेक तलाव, बंधारे झाल्यामुळे तसेच पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे विसापुर धरणात प्रत्येक वर्षी पाण्याचा पुर्ण साठा होत नाही.
हा तलाव कुकडी डावा कालावा ११४ कि.मी. असून कुकडी प्रकल्पाचे पाणी सोडण्यासाठी गेटही आहेत. त्यामुळे पाणी सोडण्यासाठी शासनाला वेगळा खर्च करण्याची आवष्यकता भासणार नसल्याचे, खा. लंके यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
विसापुर प्रकल्पाचे लाभक्षेत्र व कुकडी डावा कालवा लाभक्षेत्र सद्यस्थितीत एकच झाले आहे. त्यामुळे कुकडी डावा कालव्याचे पाणी प्रत्येक अवर्तनाला विसापुर प्रकल्पात सोडण्यासाठी या प्रकल्पाचा कुकडी प्रकल्पात समावेश करण्यात यावा. असे झाल्यास विसापुर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतीला होऊन शासनाच्या महसूली उत्पन्नात भर पडले.





