Pune District : महाळुंगे इंगळेत विविध विकासकामांचे उद्घाटन

महाळुंगे इंगळे : खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे येथे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण प्रणाली उपलब्ध व्हावी यासाठी इंट्रॅक्टिव्ह पॅनल बसविण्यात आले आहेत.
तसेच गावात विविध ठिकाणी सोलर हायमास्ट, सीसीटीव्ही कॅमेरे, आरोग्य उपकेंद्रासाठी साहित्य उपलब्ध करून दिले आहे याशिवाय विविध ठिकाणी बसण्यासाठी बाकडे, महिलांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण याशिवाय जमलं आणि प्रशिक्षण पूर्ण केले आहे अशा महिलांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, गटविकास अधिकारी खेड विशाल शिंदे, शिक्षण अधिकारी अमोल जंगले, विस्तार अधिकारी एस. एस. साळुंखे, सरपंच अर्चना महाळुंगकर, उपसरपंच नितीन फलके, माजी सरपंच मयुरी महाळुंगकर, मंगल भोसले, शेखर तुपे, वैशाली महाळुंगकर, माजी उपसरपंच विश्वनाथ महाळुंगकर, रोहिदास तुपे, ऋषिकेश मिंडे, शेखर तुपे, वैशाली महाळुंगकर
ग्रामपंचायत सदस्य किशोर भालेराव, लक्ष्मण महाळुंगकर, मनोहर इंगवले, पांडुरंग काळे, जयश्री वाळके, वैशाली जावळे, दिपाली भोसले, पल्लवी भालेराव, शाळेचे मुख्याध्यापक वायसे सर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.





