पुणे जिल्हा | केसनंद येथे तीन कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन

वाघोली, (प्रतिनिधी) – केसनंद येथे तीन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती सरपंच प्रमोद हरगुडे यांनी दिली.
केसनंद येथे कचरा व्यवस्थापन, बेरोजगारीचा प्रश्न, वाढीव पाणी योजनेला मान्यता, वृक्षारोपण, सांडपाणी व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते, व्यायाम शाळा, रुग्णवाहिका तसेच ग्रामस्थांच्या सहकार्यातून अतिक्रमण दूर करण्यात सरपंच प्रमोद हरगुडे व त्यांच्या सहकार्यांना यश आले आहे.
एक वर्षाच्या कालावधीत जवळपास पाच कोटी रुपयांच्या विकास कामांच्या डोंगर हरगुडे यांनी उभा केला आहे. या कार्याची दखल दैनिक प्रभातने आदर्श सरपंच पुरस्काराने गौरवले आहे. तसेच सामाजिक संस्थांनी देखील प्रमोद हरगुडे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
केसनंद येथील तीन कोटीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे, हवेलीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी,
युवा सेनेचे नेते किरण साळी, माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके, माजी सरपंच मिलिंद हरगुडे, विपुल शितोळे, कुंडलिक थोरात, रमेश गोते, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, तसेच केसनंद ग्रामपंचायत आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ बहु संख्येने उपस्थित होते.





