बारामतीतील इनक्यूबेशन सेंटरचे मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

बारामती (प्रतिनिधी) – येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी महाविद्यालयात च्या आवारात उभारलेल्या अटल इनक्यूबेशन सेंटरच्या अत्याधुनिक इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी (ता. 2) होणार आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया, सुळे ,राज्यमंत्री दत्ताच्य भरणे, भारत फोर्ज कंपनीचे चेअरमन व मैनेजिंग डायरेक्टर बाबा कल्याणी, किर्लोस्कर इंडस्ट्रीजचे अतुल किलोस्कर, बी जी शिर्के कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी प्राइवेट लि. चे चेंजरमन विजय शिव,
फिनोलेक्स के कार्यकारी अध्यक्ष दीपक छाब्रिया, टोरेट कंपनीचे चेअरमन सुधीर मेहता, विठलशेठ मणियार, रणजित पवार, आर वेंकट रमणन, राजू बारवाले, उषा शेअर, जगन्नाथ शिंदे, रमेश थोरात मायकेल इरकेल अनुराग प्रताप, मॅथ्यू जोसेफ, संतोष भोसले, आशुतोष चढ़ा हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ट्रस्टचे चेरमन राजेंद्र पवार यांनी ही माहिती दिली.
निती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनमार्फत २०१७-१८ या वर्षात संपूर्ण भारतातून अटल इनक्युबेशन सेंटर्सची उभारणी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले होते. यासाठी देशभरातून २६७६ पात्र संस्थांनी प्रस्ताव सादर केले होते. या अर्जामधून निती आयोगाने देशातील सर्वोत्कृष्ट २०० संस्थाना नवी दिल्ली येथे सादरीकरणासाठी बोलाविले.
होते या निवडक २०० संस्थामधून ७२ अटल इनक्युबेशन सेंटर्स उभारण्यासाठी मंजुरी दिली गेली. निती आयोगाच्या निवड समितीसमोर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी नवी दिल्ली येथे ५ फेब्रुवारी २०१८ रोजी सादरीकरण केले होते. कृषी क्षेत्रात इनक्युबेशन सेंटर्स उभारणीसाठी देशातील दोनच संस्थांना परवानगी मिळाली आणि त्यापैकी एक म्हणजे अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती,
नीती आयोगामार्फत आयोजित केलेल्या ऑफलाईन व ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅन मध्ये या इनक्युबेशन सेंटरच्या टीमने सहभाग नोंदविला असून देशातील पहिल्या पाच अग्रगण्य इनक्युबेशन सेंटरमध्ये एआयसी एडीटी बारामती फाउन्डेशनचा समावेश केला गेला आहे.
अशी असेल संकल्पना…
विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांमध्ये उद्योजकता संस्कृती वाढविणे, विशिष्ट क्षेत्र आणि डिझाइन उत्पादनांमधील विकास प्रक्रियांचा आरंभ करणे, आर्थिक तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर या इन्क्युबेशन सेंटरचा भर असून उद्योग व्यवसायाच्या नवीन संकल्पना असलेल्या सर्व वयोगटातील संभाव्य उद्योजकांना घडवण्याचे काम इनक्युबेशन सेंटर करीत आहे.
औपचारिक शिक्षण व्यवस्थेसोबतच संशोधन, उपयोजन, उद्योजकता आणि उद्यमशीलता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न या सेंटरकडून केले जात आहेत. या केंद्रात इन्क्युबेशन प्रोग्रॅमसाठी निवड झालेल्या विद्याथ्र्यांना संशोधनासाठी जागा, लॅब, इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्था, नार्गदर्शन व उद्योग स्थापण साठी बीज भांडवल अशा सुविधा अटल इंक्युवेशन सेंटर कडून पुरवण्यात येतात.
नावीन्यपूर्ण संकल्पनांवर काम करणाऱ्या संशोधक व नवउद्योजकांना प्रोडक्ट चे टेस्टिंग, ट्रायल आणि सर्टीफिकेशन, बीज भांडवल, अनुदान मिळवून देणे, व्यावसायिक व तांत्रिक तज्ज्ञांशी जोडणे आणि व्यवसायाला पूरक वातावरण व संधी निर्माण करण्यासाठी सेंटरमार्फत मार्गदर्शन केले जाते.





