पिंपरी | एकविरा विद्या मंदिर शाळेत ई-लर्निंग सेंटरचे उद्घाटन

कार्ला, (वार्ताहर) – मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा – टप्पा दोन या अभियानाची सुरूवात झाली असून यात सहभागी झालेल्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहे.
त्याअंतर्गत कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता जुनिअर कॉलेजमध्ये एमएससीआयटी आणि टॅली प्राथमिक प्रशिक्षण केंद्राचे आणि ई-लर्निंग केंद्राचे उदघाटन करण्यात आले. वेहरगाव केंद्रप्रमुख सुहास विटे, तंत्रस्नेही शिक्षक सलीम पटेल यांंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
पुस्तक वाचन पेढीचे उद्घाटन –
तालुक्याचे माजी आमदार तथा संस्थेचे माजी अध्यक्ष कृष्णराव भेगडे यांंच्या वाढदिवसानिमित्त आणि शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे यांंच्या संकल्पनेतून पुस्तक वाचन पेढीचे उद्घाटन एकविरा देवस्थानचे उपाध्यक्ष मारुती देशमुख, लेखक साहित्यिक रविंद्र कडू,
प्राचार्य संजय वंजारे यांंच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याचा उपयोग विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची आणि वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच स्पर्धा परीक्षा व शिष्यवृती परीक्षेसाठी होणार आहे.
कार्यक्रमासाठी प्राचार्य संजय वंजारे, शिक्षक प्रतिनिधी संजय हुलावळे, उमेश इंगुळकर, मच्छिंद्र बारवकर, नरेंद्र इंदापुरे, विवेक भगत, बाबाजी हुलावळे, वैजयंती कुल, काजल गायकवाड, सोनल साळुंखे, वैजयंता शेवाळे, सचिन दगडे,
संगीता खराडे, अलका आडकर, प्रणाली उंबरे, शिल्पा वर्तक, रंजना नवाळे, गणेश बोंबले, रोहिदास वाघवले यांंसह शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश इंगुळकर, संजय हुलावळे यांनी केले. तर आभार वैजयंता कुल, अनिल चौधरी यांनी मानले.



