पिंपरी | भूतानच्या सीमेवर मावळचा सुपुत्र
Updated On:

कार्ला, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील दहिवली गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भगवान सदाशिव मावकर यांची भारत सरकार द्वारा भूतान देशाच्या सीमेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
निवृत्ती झाल्यानंतरही पुन्हा देशसेवेत रूजू होत मावळच्या सुपुत्राची नाईक पदी नियुक्ती करून भूतानच्या सीमेवर सुरक्षिततेची जबाबदारी देण्यात आली आहे.
नाईक भगवान मावकर यांच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





