satara | राजेंद्र विद्यालयात एअर जी इंटरनॅशनल इनोव्हेशन लॅबचे उद्घाटन

खंडाळा, (प्रतिनिधी) – स्वातंत्र्यदिनानिमित्त खंडाळा येथील राजेंद्र विद्यालयात एअर जी इनोव्हेशन लॅबचे उद्घाटन खंडाळा विभाग शिक्षण समितीचे अध्यक्ष शंकरराव गाढवे व एअर जी इंटरनॅशनलचे प्रमुख यासीन अदम यांच्या हस्ते नुकतेच झाले.
संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पवार, सचिव अनिरुद्ध गाढवे, विद्यालयाचे प्राचार्य शब्बीर नालबंद, एअर जी इंटरनॅशनलचे सीईओ प्रतापराव पवार, संचालक, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
यासीम अदम बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांची सृजनशीलता, नवोपक्रम आणि तांत्रिक कौशल्यांच्या विकासासाठी समर्पित असलेली ही अत्याधुनिक लॅब स्थापन करून, शाळेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
या लॅबमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि इतर नवोपक्रमांसाठी तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात आले आहे. या लॅबमुळे विद्यार्थ्यांमधील शोधक वृत्ती वाढीस लागेल.
प्रतापराव पवार यांनी हा लॅब ग्रामीण भागात महत्त्वाची असल्याचे सांगून, संस्थेच्या संचालकांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. त्यांनी विद्यालयास एअर जीच्यावतीने सन्मानपत्र दिले. प्राचार्य नालबंद म्हणाले, ही लॅब म्हणजे भविष्यातील तंत्रज्ञानासोबत विद्यार्थ्यांना तयार करण्याची मोठी पायरी आहे.
ही लॅब विद्यार्थ्यांना विचारांच्या पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन, नवीन गोष्टी शोधण्याची प्रेरणा देईल. अनिरुद्ध गाढवे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहभागी करून, शिक्षणासोबत तंत्रज्ञानाची जोड देत त्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवूया. विविध कार्यशाळा, प्रकल्प, आणि स्पर्धांचे आयोजन केल्याने, विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रमाची संस्कृती रुजेल, यात शंका नाही.





