सन्मती सेवा दलाच्या संचालकांचा पदग्रहण समारंभ उत्साहात

म्हसवड – महाराष्ट्रातील जैन समाजाची धार्मिक व सामाजिक संघटना असलेल्या श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्थेच्या नूतन संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ सोलापूर येथील गुजराती भवनात नुकताच उत्साहात पार पडला. 2023-24 या वर्षासाठी अध्यक्षपदी सोलापूरच्या प्रा. मनीष शहा यांची निवड करण्यात आली आहे. संचालक मंडळात सातारा जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.
संस्थेच्या उपाध्यक्षपदी नीलेश अजितकुमार दोशी (फलटण), सचिवपदी नितेश फडे (अकलूज), सहसचिवपदी चंद्रसेन डुडू (नातेपुते), खजिनदारपदी केतन दोशी (अकलूज), सहखजिनदारपदी नवेंदू शहा (नीरा), प्रसिद्धीप्रमुखपदी संतोष शहा (वडूज), सहप्रसिद्धीप्रमुखपदी अखिल दोशी (मोडनिंब) आणि संचालकपदी राज्यातील 40 शहरांमधील सभासदांची निवड करण्यात आली. डॉ. रावसाहेब पाटील (सोलापूर), डॉ. श्रेणीक शहा (इंदापूर) यांनी मार्गदर्शन केले. मावळते अध्यक्ष वीरकुमार दोशी यांनी त्यांच्या कार्यकाळातील कार्याचा आढावा सादर केला. प्रा. मनीष शहा यांनी आगामी वर्षातील कामाच्या नियोजनाची माहिती दिली. प्रारंभी भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. संस्थापक-अध्यक्ष मिहीर गांधी यांनी प्रास्ताविक केले.
सौ. सुवर्णा कटारे यांनी सूत्रसंचालन केले. प्राणिमित्र विलास शहा, सुहास शहा (कुर्डुवाडी), माजी अध्यक्ष जिनेंद्र दोशी, महावीर शहा, प्रीतम कोठारी, नवजीवन दोशी, डॉ. राजेश शहा, मयूर गांधी, संदेश गांधी, सोलापूरमधील जैन समाजमंदिर व संघटनेचे पदाधिकारी अनिल जमगे, रावसाहेब पाटील, केतन शहा, सुनील गांधी (हरिभाई देवकरण), चारुकीर्ती शिरसोडे, शाम पाटील, दीपक आहेरकर, विशाल मेहता, शिरीष चंकेश्वरा, गौतम छाजेड व समाजबांधव उपस्थित होते. नूतन संचालक राहुल शहा, प्रथमेश कासार, किशोर म्हेत्रे, शुभम मेहता, सोलापूर शहरचे माजी संचालक महेश नळे, विक्रांत शहा, नीलेश शहा, किरण कासार, सौ. कामिनी गांधी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. श्री आदिनाथ महाराज जैन ट्रस्ट, पंचम जैन समाज विकास मंडळ, कासार जैन समाज प्रतिष्ठान, दिगंबर जैन जागरण युवा संघ, जैन सोशल ग्रुप व मित्र परिवाराच्यावतीने नूतन पदाधिकारी व संचालकांचा सत्कार करण्यात आला.





