यवतमाळ जिल्ह्यात महाविकास आघाडीने उधळला गुलाल; भाजपा आणि शिंदे गटाला धक्का

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील 7 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल घोषित झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात महाविकास आघाडीने या निवडणुकीत गुलाल उधळला आहे. तर भाजपा आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
1) यवतमाळ बाजार समिती- कॉग्रेस, शिवसेना ठाकरे गटाच्या युतीला 11 जागा तर भाजप आणि शिंदे गटला 4 जागा तर 3 अपक्ष विजयी
2) दिग्रस उत्पन्न बाजार समिती – महाविकास आघाडीला 14 तर पालकमंत्री संजय राठोड यांच्या गटाला 4 जागा. उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख यांचा मोठा विजय
3) बाभूळगाव बाजार समिती – महाविकास आघाडीला 14 जागा तर भाजप-शिंदे गटाला 4 जागा.
4) महागाव बाजार समिती- भाजप आणि शिंदेगटाला 11 जागा तर कॉग्रेस 2 राष्ट्रवादी 5 अनेक वर्षांपासूनची नाईक परिवाराची राष्ट्रवादीची सत्ता भाजपने उलथवली भाजप शिंदेगट युतीकडे बाजार समिती.
5) वणी बाजार समिती- भाजप-शिंदे गटाला 14 जागेवर यश. महाविकास आघाडीला 4 काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावर आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांना झटका. भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात बाजार समितीत मोठे यश.
6) पुसद उत्पन्न बाजार समिती- महाविकास आघाडीकडे 18 पैकी 18 जागेवर विजयी मिळवण्यात यश. भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का
7) नेर बाजार समिती- उध्दव ठाकरे आणि काँग्रेस आघाडी 8 जागा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी 10 जागा. पालकमंत्री संजय राठोड यांचा पॅनलचा निसटता विजय.





