आदिस अबाबा – पृथ्वीवर एक असा देश आहे, जिथे वर्षात 12 नाही तर एकूण 13 महिने असतात. या 13 महिन्यांमुळे हा देश संपूर्ण जगाच्या तुलनेत सात वर्षांनी मागे पडला आहे. ‘इथिओपिया’ असे या देशाचे नाव आहे. जगात अशा अनेक संस्कृती आहेत, ज्या कालगणनेसाठी वेगवेगळ्या प्रकारचं कॅलेंडर वापरतात. ही सर्व कॅलेंडर्स पाश्चात्य ग्रेगॉरियन कॅलेंडरप्रमाणे नसली तरी त्यातसुद्धा एका वर्षात 12 महिने असतात. पण आफ्रिका खंडातील ‘इथिओपिया’ देशामध्ये एका वर्षात एकूण 13 महिने असतात. 13व्या महिन्यात पाच दिवस असतात. एका आठवड्यातदेखील पाच दिवस असतात. ज्या वर्षी लीप वर्ष असतं, त्या वर्षी इथियोपियाच्या कॅलेंडरमधल्या 13व्या महिन्यात सहा दिवस असतात. संपूर्ण जगाने आठ महिन्यांपूर्वीच 2024 य वर्षाचे स्वागत केलं आहे. इथियोपियामध्ये 11 सप्टेंबर रोजी 2024 या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. जगातील बहुतांश देशांमध्ये पाश्चात्य ग्रेगॉरियन कॅलेंडरला मान्यता आहे. काही देश त्यांच्या प्राचीन कॅलेंडरचं पालन करतात. इथिओपियामध्ये आजही रोमन चर्चने सुधारित केलेलं कॅलेंडर पाळलं जातं. या कारणास्तव इथिओपियामध्ये 11 सप्टेंबर 2007 रोजी नवीन शतकाची सुरुवात झाली आहे.इथिओपिया हा एकमेव आफ्रिकन देश आहे, जो कधीही ब्रिटनचा गुलाम बनला नाही. एके काळी हा देश इटलीच्या ताब्यात होता. सहा वर्षांनी इटलीने हा देश मुक्त केला. ग्रेगॉरियन कॅलेंडरनुसार, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशी महिन्यांची नावं आहेत. इथिओपियन म्हणजेच गीझ कॅलेंडरमधल्या महिन्यांची नावं वेगळी आहेत. पहिल्या महिन्याचं नाव मेस्केरेम आहे. हा महिना 11 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यानंतर टिकिमट, हिदर, तहसास, तिर, याकातित, मॅग्गाबित, मियाझिया, गिनबोट, सेंसे, हामले, नेहासा आणि पागुमे हे महिने येतात.