landslides in Ethiopia : इथिओपियात मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन; आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू, १२५ बेपत्ता
दक्षिण इथिओपियातील भौगोलिक स्थिती आणि सततचा पाऊस यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

इथिओपियातील ‘गामो झोन’मध्ये हे भूस्खलन झाले. याचा सर्वाधिक फटका गाचो बाबा, कांबा आणि बोंके या तीन जिल्ह्यांना बसला आहे. गामो झोनचे आपत्ती प्रतिसाद संचालक मेस्फिन मनुका यांनी सांगितले की, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. चिखलाच्या ढिगाऱ्याखालून एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे, मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
गाचो बाबा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अबेबे एजेना यांच्या माहितीनुसार, अनेक नागरिक चिखलात गाडले गेले आहेत. किती घरे जमीनदोस्त झाली आहेत, याचा अचूक आकडा अद्याप समजू शकलेला नाही.
दक्षिण इथिओपियातील भौगोलिक स्थिती आणि सततचा पाऊस यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके प्रयत्न करत आहेत.





