इथिओपिया : दक्षिण इथिओपियामध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात किमान 71 लोकांचा मृत्यू झाला आहे. राजधानी अदिस अबाबाच्या दक्षिणेस अंदाजे ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या सिदामा राज्यात प्रवाशांनी भरलेला ट्रक नदीत बुडाल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात आतापर्यंत ६८ पुरुष आणि तीन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सिदामा प्रादेशिक आरोग्य ब्युरोने सशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये नदीत पडलेला ट्रक अर्धवट पाण्यात बुडलेला दिसतो आहे. काही प्रवासी लग्न समारंभातून परतत होते आणि काही कुटुंबांतील एकापेक्षा जास्त व्यक्तींचा या अपघातात मृत्यू झाला आहे. ट्रकमध्ये क्षमतेपे७ जास्त प्रवासी भरले होते, असे या भागातील वाहतूक पोलिसांनी सांगितले, याच कारणामुळे अपघात झाला असण्याची शक्यता आहे. मात्र, घटनेच्या वेळी विमानात नेमके किती प्रवासी होते, याबाबत अधिकाऱ्यांनी खुलासा केलेला नाही. आफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे लोकसंख्या असलेल्या इथिओपियामध्ये रस्ते अपघात हे सामान्य आहेत, जिथे रस्त्यांची अनेकदा देखभाल केली जात नाही. २०१८ मध्ये इथिओपियाच्या उत्तरेकडील पर्वतीय भागात बस दरीत कोसळल्याने किमान ३८ लोक ठार झाले, त्यात बहुतांश विद्यार्थी होते.