पिंपरी | श्रावण महिन्यात भाज्यांचे दर गगनाला

कान्हे, (वार्ताहर) – श्रावण महिना आणि गणेशोत्सवात बहुतेक घरांमध्ये मांसाहाराचे सेवन केले जात नाही, यामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे. मागणी वाढताच भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. मेथी ५्० ते ६० रुपये, कोथिंबीर ९० ते १०० रुपये आणि लसूण दीडशे रुपये किलोपर्यंत जाऊन पोहचला आहे. महाग होत चालेल्या भाज्यांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडत आहे.
मावळ तालुक्यातील आठवडे बाजारामध्ये पाल्या भाज्यांचे भाव गगनाला भिडल्याचे चित्र दिसून येत आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक गणेशभक्त शाकाहाराचेच सेवन करतात.
त्यामुळे शाकाहारी भाज्यांच्या मागणीत वाढ झाली आहे मागणी वाढल्याने बाजारातील दर वाढले आहेत. पावसामुळे आवक घटल्याने मेथी, कोथिंबीरसारख्या भाजीपाल्यांचे दर वाढले आहे. याचा सामान्य ग्राहकाच्या खिशाला मोठा भार पडत आहे
श्रावण महिन्यामध्ये व गणेश उत्सवात सर्वत्र शाकाहारी भाजीपाल्याला मोठी मागणी असते. परंतु रोजचा भाजीचा खर्च इतका अधिक वाढला आहे, ज्यामुळे सर्वसामान्य गृहिणीचे बजेट कोलमडत आहे – शिलाबाई येवले, गृहिणी





