लोकसभा निवडणुकीत पैसा हरला स्वाभिमान जिंकला

पारनेर- लोकसभा निवडणुकीत पारनेर, नगरच्या जनतेने मताधिक्य देत अनेक आमिषे धुडकावून लावत आपला स्वाभिमान जपत मला साथ दिली. त्यामुळे तुम्ही तुमचे काम मतदानाच्या माध्यमातून केले असून, या पुढील काळात तुमची कामे करण्याची जबाबदारी माझी आहे . त्यामुळे या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार सर्वसामान्य जनता असून या लोकसभा निवडणुकीत पैसा हरला स्वाभिमान जिंकला, असा टोला खासदार नीलेश लंके यांनी लगावला.
वडगाव सावताळ व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने लोकसभा निवडणुकीत विजय संपादन केल्याबद्दल खासदार नीलेश लंके यांच्या पेढेतुला कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य ज्ञानदेव पाडुंळे होते.
यावेळी माजी सभापती सुदाम पवार] प्रा.संजय लाकूडझोडे, अॅड. राहुल झावरे, उद्योजक अजय लामखडे, पोपट साळुंखे, बाळासाहेब खिलारी, रवींद्र झावरे, डॉ. नितीन रांधवन. डॉ.रावसाहेब आग्रे, सरपंच संजय रोकडे, तालुकाध्यक्ष योगेश शिंदे, कर्ण रोकडे, दादाभाऊ रोकडे, मोहन रोकडे, सतीश तिखोळे, संतोष खामकर, निवृत्ती शिंदे, विकास भनगडे, तुकाराम रोकडे, दादाभाऊ शिंदे, अविनाश रोकडे, दत्तात्रय शिंदे, दत्तात्रय साळुंके, बाबासाहेब गांगड रावसाहेब बर्वे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या लोकसभा निवडणुकीत बलाढ्य विरूद्ध सर्वसामान्य अशी लढाई केवळ सर्वसामान्यांच्या जीवावर व त्यांच्या पाठिंब्यवर आपण जिंकली आहे. निवडणूक जाहीर होताच तालुक्यातील सर्वच पुढारी लाभापोटी व अमिषापोटी विरोधकांना जाऊन मिळाले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मतांच्या जीवावर आपण लोकसभेत पोहोचलो असून, आता सर्वसामान्य जनतेची व विकासकामांची जबाबदारी माझी असल्याचे खासदार नीलेश लंके म्हणाले.
..तर वडगाव सावताळलाची उमेदवारी दिली असती
वडगाव सावताळ येथील कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी लोकसभा निवडणुकीत मताधिक्य दिल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आमच्या गावाला संधी मिळावी, असे म्हणून दोघा तिघांच्या नावाची शिफारस केली. हाच धागा पकडून खासदार नीलेश लंके यांनी आपल्या भाषणामध्ये मला दोन महिन्यांपूर्वी माहित जर असते तर लोकसभा निवडणुकीचा उमेदवार तुमच्या गावातून दिला असता, असे म्हणतात एकच हशा पिकला.





