पहिल्या टप्प्यात एकटे भगवंत मान घेणार शपथ; बाकीच्या मंत्र्यांचा शपथविधी उशिरा
Updated On:

चंदीगड – पक्षाचे नेते भगवंत मान हे एकटे 16 मार्च रोजी स्वातंत्र्य सेनानी भगतसिंग यांच्या मूळ गाव खतकर कलान येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तर 16 मंत्री नंतर शपथ घेणार आहेत अशी माहिती आम आदमी पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे.
शपथविधी सोहोळा ऐतिहासिक ठिकाणी होणार असल्याने त्या दिवशी केवळ मुख्यमंत्र्यांचाच शपथविधी होईल असे पक्षाने म्हटले आहे. मंत्रिमंडळाच्या निवडीसाठी पक्षाने भगवंत मान यांना मोकळीक दिली आहे असे सांगितले जाते.त्यामुळे मंत्रिपदाविषयी आपच्या नवनिर्वाचित आमदारांमध्ये मोठे औत्स्युक्य निर्माण झाले आहे.
ही रचना नेमकी कशी असेल या विषयी पक्षाकडून आत्तापर्यंत कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत. तथापि आधी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि नंतरच्या काळात मंत्रिमंडळ विस्तार या प्रकाराबद्दल अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.





