Pro Kabaddi 2024 (Match 107) | दिल्ली संघ ठरला ‘दबंग’, रोमहर्षक लढतीत टायटन्सचा केला पराभव…

Pro Kabaddi 2024 (Dabang DelhiKC vs Telugu Titans) :- प्रो कबड्डी लीग 2024 च्या 107 व्या सामन्यात, दबंग दिल्ली KC ने तेलुगू टायटन्सचा 33-27 असा पराभव करून शानदार विजय नोंदवला. या विजयासह दिल्लीचे 61 गुण झाले असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आले आहेत. टायटन्स 55 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. पीकेएलमध्ये टायटन्स दिल्लीला पराभूत करण्यात अपयशी ठरलेला हा सलग सहावा हंगाम (7 वर्षे) आहे.
दबंग छोरों ने रोमांचक मुक़ाबले में टाइटंस को चटाई धूल 🤯💙#ProKabaddi #PKL11 #ProKabaddiOnStar #LetsKabaddi #DabangDelhiKC #TeluguTitans pic.twitter.com/9trBUQzj9d
— ProKabaddi (@ProKabaddi) December 12, 2024
पूर्वार्धात चार गुणांनी पिछाडीवर असलेल्या दबंग दिल्ली संघाने तेलुगु टायटन्सवर 33-27 असा रोमहर्षक विजय नोंदविताना प्रो कबड्डी लीगमध्ये ‘प्लेऑफ’च्या आशा कायम ठेवल्या. दिल्ली व तेलुगु या दोन्ही संघांनी सावध सुरुवात करत बरोबरीत होते. मात्र, सामन्याच्या 12 व्या मिनिटांपासून तेलुगु संघाने सामन्यावर पकड घेण्यास सुरुवात केली. पंधराव्या मिनिटाला त्यांनी पहिला लोण नोंदविला. मध्यंतराला त्यांनी 17-13 अशी आघाडी घेतली होती.
उत्तरार्धात सुरुवातीलाच दिल्ली संघाने पहिला लोण चढवीत18-18 अशी बरोबरी साधली. सामन्याच्या 25 व्या मिनिटाला तेलगू संघाकडे 21-18 अशी आघाडी होती. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना दिल्लीने 25-25 अशी बरोबरी होती.
Pro Kabaddi 2024 (Match 105) | हरियाणा स्टीलर्सने शानदार विजयासह प्लेऑफमध्ये केला प्रवेश…
पुढच्याच मिनिटाला दिल्ली संघाने आणखी एक लोण नोंदविला आणि चार गुणांची आघाडी मिळवली. तेलुगु संघाकडून आशिष नरवाल, विजय मलिक यांनी तर दिल्ली संघाकडून नवीन कुमार, आशु मलिक यांनी चमकदार कामगिरी केली.





