Shirur Assembly Election : शिरुर तालुक्यात मतदारांनी रात्री उशिरापर्यंत बजावला मतदानाचा हक्क
Updated On:

निमोणे:- शिरुर तालुक्यात आज विधानसभेसाठी मतदान पार पडले. परंतु सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने शेतीची कामे सुरु असल्याने अनेक गावात मतदारांनी दुपारपर्यंत मतदानाकडे पाठ फिरविली. परंतु दुपारनंतर मात्र मतदान केंद्रावर गर्दी केली. त्यामुळे प्रशासनावर ताण आल्याने मतदारांनी रात्री उशिरापर्यंत मतदानाचा हक्क बजावला.
शिरुर तालुक्यातील अनेक गावात आज हिच परिस्थिती पहायला मिळाली. अनेक गावात तरुणांनी यावेळेस मतदानाचा हक्क बजावला. दुपारी तीन नंतर प्रत्येक गावातील मतदान केंद्रावर मतदान केंद्रावर मोठया प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी 6 नंतर मतदान केंद्राचे प्रवेशद्वार बंद झाल्यानंतरही मतदान केंद्राच्या मतदारांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे प्रशासनावर मोठया प्रमाणात ताण आल्याचे चित्र पहायला मिळाले.





