सातारा -जिल्ह्यात काल (दि. 19) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार, 169 नागरिक करोनाबाधित झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी सोमवारी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेऊन करोनावर मात केलेल्या 465 जणांना सोमवारी घरी सोडण्यात आले.
जिल्ह्यातील करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि त्यापुढे कंसात आजपर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची एकूण संख्या – सातारा 51 (50699), फलटण 42 (36391), खटाव 20 (25194), माण 15 (17481), कराड 12 (38614), खंडाळा 7 (14023), वाई 7 (15639), कोरेगाव 5 (21628), पाटण 2 (10147), जावळी 1 (9934), महाबळेश्वर 0 (4646) व इतर 7 (2037), असे आजपर्यंत एकूण दोन लाख 46 हजार 433 करोनाबाधित आहेत. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण सहा हजार 43 करोनाबळी झाले आहेत.