‘आप’चा निर्णय! पंजाबात 184 नेत्यांची सुरक्षा काढली

चंदीगड – आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि अमृतसर मतदारसंघातील आमदार जीवन ज्योत कौर यांनी पंजाबमधील “आप” सरकारने 184 माजी मंत्री व नेत्यांचे व्यक्तीगत सुरक्षा कवच काढून घेण्याच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
शनिवारी पंजाब पोलिसांनी 184 माजी मंत्री, माजी आमदार आणि इतर नेत्यांचे सुरक्षा कवच काढून घेण्याचे आदेश दिले. सुरक्षा गमावलेल्या 184 व्हीआयपींमध्ये माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, गुरदर्शन ब्रार, आयपीएस गुरदर्शन सिंग आणि उदयबीर सिंग यांच्या कुटुंबांचा समावेश आहे.
त्यांच्या बरोबरच माजी कॅबिनेट मंत्री- सुरजितसिंग राखरा, बीबी जागीर कौर, तोता सिंग,माजी कॉंग्रेस खासदार वरिंदर सिंग बाजवा, संतोष चौधरी, कॉंग्रेसचे माजी आमदार दीप मल्होत्रा यांचीही सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. .
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश बग्गा, भाजपचे स्टार प्रचारक माही गिल, भाजपचे नेते हरिंदर सिंग कोहली यांचीही सुरक्षा काढण्यात आली आहे.





