पुणे जिल्ह्यात 47,729 मतदारांनी स्वीकारला ‘नोटा’ पर्याय

पुणे – जिल्ह्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024 विधानसभा निवडणुकीत “नोटा’ (नकाराधिकार) पर्यायाचा कमी मतदारांनी स्वीकारला आहे. 2019 मध्ये जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात एकूण 47 हजार 729 मतदारांनी नोटाचा पर्यायाला पसंती दिली होती. तर 2024 मध्ये यामध्ये घट झाली असून 42 हजार 919 मतदारांनी “नोटा’चा पर्यायाला पसंती दिली आहे. यावरून मतदारांनी यंदा पक्ष आणि पक्षाच्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याचे निकालावरून समोर आले आहे.
निवडणूक आयोगाने रिंगणातील उमेदवाराची निवड करण्याबरोबरच त्यांना नाकारण्याच्या अधिकारही दिला आहे. त्यासाठी “ईव्हीएम’ नोटाचे स्वतंत्र बटन देण्यात आले आहे. रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी कोणताही उमेदवार योग्य वाटत नसेल, तर नोटाच्या माध्यमातून ते निर्णय घेऊ शकतात.
पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघातील ४७ हजार ७२९ नागरिकांनी आपल्या या अधिकाराचा वापर केला असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक वडगाव शेरीतील नागरिकांनी त्याचा वापर केला आहे. येथे सर्वाधिक म्हणजे ४ हजार २५९ मतदारांनी “नोटा’ला पर्यायाला पसंती दिली आहे. तर सर्वांत कमी म्हणजे ६३४ मतदारांनी इंदापूर मतदारसंघात नोटा बटन दाबून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
पिंपरी मतदारसंघात ४ हजार १३ आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात ४ हजार ३१६ मते नोटाच्या माध्यमातून नोंदविली गेली आहे. तर, बारामती मतदार संघात ७७९ “नोटा’ च्या मतांची नोंद झाली आहे. २१ मतदार संघांतील एकूण मतदानाच्या तुलनेत “नोटा’चे प्रमाण हे एक टक्क्यापेक्षाही कमी असल्याचे दिसून आले आहे.
मतदारसंघ आणि नोटा मतदान
कोथरूड – ३,१५२, खडकवासला- २,९००, पर्वती – २,४६१, कसबा पेठ – १,२१३, शिवाजीनगर – २,०४४, पुणे कॅन्टोमेंन्ट – १,८१५, हडपसर – २,९४६, वडगावशेरी – ४,२५९, आंबेगाव – १,१५७, खेड-आळंदी – १,६९२, जुन्नर – १,३७६, शिरूर – २,१५७, मावळ – २,७१५, पुरंदर – १,४८४, बारामती – ७,७९, दौंड – १,२११, इंदापूर – ६३४,
भोर – २,७२०, पिंपरी- ४,०१३, चिंचवड – ४,३१६, भोसरी- २,६८५





