मीरा-भाईंदरमध्ये श्रीरामाचे झेंडे असलेल्या गाड्या फोडल्या, दोन गटात मोठा राडा; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले….

Devendra Fadnavis – देशात एका बाजूला प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत असताना, दुसऱ्या बाजूला ठाण्यातील मीरा रोड भागात मोठा राडा झाला आहे. ज्या गाड्यांवर श्रीराम नावाचे झेंडे होते, अशा गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याने याठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला.
तर तोडफोड करणाऱ्या व्यक्तींना यावेळी ‘अल्लाह हू अकबर…’ अशा घोषणा देखील करण्यात आल्या. दोन गटामध्ये हाणामारी झाल्यानंतर सहा जणांना ताब्यात घेण्यात आले घेतले. ही घटना रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडली असून, सोमवारी पोलिसांनी ही माहिती दिली.
मात्र, या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना निर्देश दिले आहे की, कारवाई करावी तसेच या घटनेतील सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या घटनेवर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी लक्ष द्यावे अशी मागणी केली होती.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की, ‘मीरा-भाईंदरमधील नयानगर भागात काल रात्री घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती काल रात्रीच घेतली आहे. सोमवारी पहाटे 3.30 वाजेपर्यंत मी मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात होतो. आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.
मीरा-भाईंदरमधील नयानगर भागात काल रात्री घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती काल रात्रीच घेतली आहे. सोमवारी पहाटे 3.30 वाजेपर्यंत मी मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात होतो. आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.
या प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 22, 2024
या प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून अन्य आरोपी ओळखण्याची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था कुणी बिघडविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही’. या आशयाचे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.





