Konkan Nagarparishad-Nagarpanchayat Election | मालवणमध्ये शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी स्ट्रिंग ऑपरेशन करत भाजपा पदाधिकारी पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्याच्या गाडीत पैसे पकडले त्यावेळी देखील पोलिसांना मालवण पोलीस ठाण्यात जाऊन कारवाई करण्यास भाग पाडलं. यावरून त्यांनी थेट भाजपवरच निशाणा साधला होता. भाजपाचे आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यात वादही पाहायला मिळाला. त्याच मालवण नगरपरिषदेत नितेश राणेंना निलेश राणे वरचढ चढल्याचे दिसले. मालवण नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेची मोठी झेप घेतली आहे. शिवसेना शिंदे गट 10 जागांवर विजयी, तर भाजपाला फक्त 5 जागांवर विजय मिळवला. शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली. तर भाजपकडून नितेश राणेंनी सर्व सूत्रे हाती घेतले होते. त्यामुळे नितेश राणेंना मालवणमध्ये मोठा धक्का बसला आहे. निलेश राणे काय म्हणाले? मालवणमध्ये शिवेसना शिंदे पक्षाचा विजय झाला आहे. या विजयानंतर निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “विजय हा एकट्याचा नसतो, हा विजय जनतेचा आहे. आज माझ्या भावना अशा आहेत की, एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्यात डोळ्यात अश्रू आहेत. आम्ही शहर विकास आघाडी म्हणून लढलो असलो तरी आमच्या समोर जे कोणी लोक होते, ते भाजपाचे होते, ते देखील आमचंच कुटुंब आहे. मात्र, तरीही कुटुंब एका बाजूला आणि निवडणूक दुसऱ्या बाजूला होती”, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. Konkan Nagarparishad-Nagarpanchayat Election | दीपक केसरकरांना धक्का दुसरीकडे, सावंतवाडी नगरपरिषद आणि वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सावंतवाडीमधून नगराध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपच्या श्रद्धा राजे भोसले 900 मतांनी विजयी झाल्या आहेत. सावंतवाडी नगरपरिषदेत भाजपाचा 11, शिवसेना शिंदे गटाला 7, काँग्रेसला 1 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 उमेदवार विजयी झाला. Konkan Nagarparishad-Nagarpanchayat Election | हेही वाचा: शिंदे गटाने नांदगावचा गड राखला! ऐतिहासिक विजय मिळवत समीर भुजबळांना धक्का