Nandgaon Nagarparishad Election | नाशिक जिल्ह्यातील नांदगाव नगरपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं नांदगावचा गड राखत एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत या निवडणुकीत शिवसेनेचे सर्व नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. हा एक ऐतिहासिक विजय ठरला आहे. नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहे. नांदगाव नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरवातीपासूनच सर्व जागांवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेेदवार आघाडीवर राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते माजी खासदार समीर भुजबळ यांना या निवडणुकीत धक्का बसला. या निवडणुकीत आमदार कांदे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी पॅनल उभे केले होते. त्यात दोन्ही नेत्यांचे प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सागर हिरे यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे उमेदवार राजेश बनकर यांचा पराभव केला. Nandgaon Nagarparishad Election | नांदगाव नगरपरिषदेच्या 7 जागांवर आमदार सुहास कांदे गटाचे नगरसेवक बिनविरोध आले होते. आज झालेल्या मतमोजणीत 13 जागांवर याच पक्षाचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आमदार कांदे यांनी नांदगावची सत्ता राखली आहे. Nandgaon Nagarparishad Election | हेही वाचा : भगूरच्या राजकारणात मोठा बदल! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता उलथवली