राज्यात पुन्हा पुन्हा ‘जय मीम, जय भीम’ पॅटर्न….? ; इम्तियाज जलील म्हणाले,”प्रकाश आंबेडकरांच्या युतीसाठी आमची…”

Imtiyaz Jaleel । लोकसभा निवडणुका लागल्या आणि राज्याच्या राजकारणात उलटफेर होण्यास सुरुवात झाली. त्यातच नवनवीन समीकरणं जुळण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. दरम्यान, 2019 प्रमाणे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती होणार असल्याची परिस्थिती निर्माण झालीय. कारण प्रकाश आंबेडकरांच्या युतीसाठी आमची दारं आजही उघडी असल्याचे वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलंय. विशेष म्हणजे, प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत एकत्रित येऊन नवं समीकरण तयार करावं, असेही इम्तियाज जलील म्हणालेत.
पक्ष आंबेडकर यांच्यासोबत युतीसंदर्भात बोलताना जलील यांनी, काहीतरी घडलं असेल त्यामुळे आमची युती तुटली. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत विचार करायला पाहिजे, अशी आमची अपेक्षा होती. प्रकाश आंबेडकरांनी अजुनही विचार केला पाहिजे की, आम्ही अशा पद्धतीनं एक नवं समीकरण तयार करून अधिकाअधिक जागांवर विजय मिळवू शकतो. माझं मन,आमचे दरवाजे आणि सर्व काही प्रकाश आंबेडकरांसाठी आजीही खुले आहे. त्यांनी एकत्र यावेत आपण मिळून काहीतरी करू, असेही जलील म्हणालेत.
जनता घाणेरड्या राजकारणाला कंटाळली Imtiyaz Jaleel ।
पुढे बोलतांना जलील म्हणाले की, ‘सर्वसामान्य माणूस या घाणेरड्या राजकारणामुळे वैतागला आहे. रात्री झोपताना एका पक्षात आणि सकाळी उठल्यावर दुसऱ्या पक्षात गेल्याचं कळतं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकत्र आल्यास काही तरी करू असंही जलील म्हणाले.
पुन्हा ‘जय मीम, जय भीम’ पॅटर्न….Imtiyaz Jaleel ।
2019 च्या लोकसभा निवडणुकीत ‘जय मीम, जय भीम’ची घोषणा करत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रित आले होते. यावेळी असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले होते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील यांच्या रूपाने या युतीने खातं उघडलं होतं. अनेक ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर उमेदवारांनी मते मिळवली होती. पण, याचवेळी प्रकाश आंबेडकर यांचा अकोल्यातून पराभव झाला. पुढे ही युती तुटली आणि त्यानंतर हे दोन्ही पक्ष गेल्या पाच वर्षात एकदाही एकत्रित आले





