इम्तियाज जलील विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात; ‘या’ मतदारसंघात होणार तिहेरी लढत

Imtiaz Jaleel | छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एमआयएम पक्षाकडून इम्तियाज जलील यांना औरंगाबाद पूर्व मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगाबाद पूर्व हा मतदारसंघ महत्त्वाचा आहे.
तिहेरी लढत होणार
या मतदारसंघात अल्पसंख्याकांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळेच जलील यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या जागेसाठी महायुतीकडून भाजपाचे नेते अतुल सावे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीने जागेसाठी काँग्रेसने एम के देशमुख यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता तिहेरी लढत होणार आहे. 2019 मध्ये या मतदारसंघातून भाजपचे नेते व मंत्री अतुल सावे विजयी झाले होते. Imtiaz Jaleel |
इम्तियाज जलील यांनी 2014 मध्ये औरंगाबाद (मध्य) मधून निवडणूक लढविली होती. त्यांना ६१ हजार ८४३ मते मिळवून ते विजयी झाले होते. तेव्हा शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांना ४१ हजार ८६१ आणि भाजपच्या किशनचंद तनवाणी यांना ४०७७० मते मिळाली होती. २०१९ मध्ये कॉंग्रेसने ही जागा समाजवादी कॉंग्रेस पक्षास सोडली होती. Imtiaz Jaleel |
दरम्यान, एमआयएम पक्षाकडून महाविकास आघाडीसोबत जागावाटपाचा प्रयत्न चालू होता. मात्र आता हा पक्ष या निवडणुकीत ‘एकला चलो रे’ अशी भूमिका घेण्याची शक्यता आहे. कारण तसे सूतोवाचच एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केले आहे. Imtiaz Jaleel |
हेही वाचा:





