imtiyaz jaleel : इम्तियाज जलील यांनी शिंदे सरकारला दिला इशारा म्हणाले,’वंदे भारतच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाही, तर दणका…’

imtiyaz jaleel – वंदे भारत ट्रेनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. वंदे भारत ट्रेनमधील प्रवास हा रेल्वे प्रवाशांसाठी चांगला अनुभव ठरत आहे. अशात उद्या शनिवारी जालना येथून वंदे भारत रेल्वे धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
औरंगाबाद से सांसद रहते हुए मैंने रेल और हवाई कनेक्टिविटी के लिए लोकसभा में सबसे ज्यादा सवाल उठाए थे। अब जब ऐसा हो रहा है तो वे आसानी से निमंत्रण सूची में मेरा नाम जोड़ना भूल जाते हैं। हालाँकि मुझे इसकी ज़्यादा परवाह नहीं है लेकिन विकास के मुद्दों पर भी यह गंदी राजनीति क्यों?… pic.twitter.com/htUN1hX9Hl
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) December 29, 2023
दरम्यान, या कार्यक्रमाचा निमंत्रणावरून आता राजकारण तापले आहे. वंदे भारत रेल्वेच्या उदघाटनाला खासदार इम्तियाज जलील यांना आमंत्रण दिले नाही. यावरून इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं नाही आता दणका दाखवणार असा जलील यांनी जाहिर नाराजी व्यक्त करत असा इशाराच सरकारला दिला आहे.
त्यांनी ट्विट केले आहे की,’औरंगाबादचा खासदार असताना रेल्वे आणि हवाई संपर्कासाठी मी लोकसभेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले होते. आता हे घडत असताना निमंत्रण यादीत माझे नाव टाकायला ते सोयीस्करपणे विसरतात. मला त्याची फारशी पर्वा नसली तरी विकासाच्या मुद्द्यावरही हे गलिच्छ राजकारण का, असा सवाल त्यांनी विचारला आहे. जालन्यातून गाडी सुरू होते पण त्यांनी परभणीच्या खासदाराचे नाव जोडले तर औरंगाबादच्या खासदाराचे नाव का नाही? घाणेरडे राजकारण करता येत असेल तर उद्या मीही गलिच्छ खेळ खेळेन तयार करा, असा ट्विट करत सरकारला इशाराच त्यांनी दिला आहे.





