विशेष तपास पथकाकडून इम्रान खान यांची अटक तुरुंगात कसून चौकशी

इस्लामाबाद – पाकिस्तानात 9 मे रोजी झालेल्या दंगलीतील सहभागाबद्दल विशेष तपास पथकाने पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांची अटक येथील तुरुंगात जाऊन कसून चौकशी केली आहे. इम्रान खान यांची तुरुंगात जाऊन चौकशी करण्यास दहशतवाद विरोधी न्यायालयाने या विशेष तपास पथकाला परवानगी दिली होती. दिनांक 6 मे रोजी झालेल्या दंगलीव्यतिरिक्त अन्य सहाप्रकरणीदेखील इम्रान खान यांची चौकशी करण्यात दहशतवादविरोधी न्यायालयाने या विशेष पथकाला परवानगी दिली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला अटक झाल्यापासून इम्रान खान यांना खैबर पख्तुन्वा प्रांतातील अटक येथील तुरुंगातच ठेवण्यात आले आहे.
चौकशीदरम्यान इम्रान खान यांची पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारणे, युद्धाचा प्रयत्न करणे, सैनिक, नाविक किंवा हवाई दलाला त्याच्या कर्तव्यापासून फूस लावणे आणि प्रक्षोभक विधाने करण्याच्या गुन्ह्यांबाबत चौकशी करण्यात आली.
त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अन्य गुन्ह्यांमध्ये अक्सारी टॉवर, शादमान पोलीस स्थानकावर हल्ला करणे, पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाच्या लाहोरमधील कार्यावलयाची जाळपोळ, मॉडेल टाऊन आणि जिन्हा हाऊसची मोडतोड तेसी जाम्याबाबतही ही चौकशी करण्यात आली. इम्रान यांच्या जिवाला अटक तुरुंगात धोका असल्याचा आरोप इम्रान यांच्या पत्नी बुशरा बिबी यांनी केला आहे. आपल्याला इम्रान यांची भेटदेखील घेऊ दिली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.





