Nagar | ‘आनंदऋषीजी हॉस्पिटल’ची महती राज्यभर : अमोल ललवाणी

नगर, (प्रतिनिधी) – आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये शिबिराचे माध्यमातून गरजू रुग्णांना सवलतीच्यादरात तसेच मोफत उपचार दिले जातात. आनंदऋषीजी हॉस्पिटल मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा, असे समजून माणुसकीच्या दृष्टिकोन ठेवून समाजातील दीनदुबळ्या घटकांची सेवा करीत आहे.
जैन सोशल फेडरेशनच्या सदस्यांनी ललवाणी परिवाराला शिबिराच्या माध्यमातून सेवेची संधी दिली आहे.समाजातील व्यक्तींनी आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवाकार्यात मदत करावी.
आनंदऋषीजी हॉस्पिटल ची सेवा कार्याची महती जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर पसरली आहे.असे प्रतिपादन उद्योजक अमोल ललवाणी यांनी केले आहे.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या १२४ व्या जन्मजयंती निमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर येथे मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन अशोक सुवालाल ललवाणी (प्रवरा संगम)व ललवाणी परिवाराच्यावतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आले आहे. यावेळी ते बोलत होते.
यावेळी संजय लोढा, पुजा ललवाणी, दिशा ललवाणी, दिव्यम ललवाणी, विनोद बलदोटा, सुवालाल ललवाणी आदींसह जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, प्रकाश छल्लाणी,डॉ.आशिष भंडारी तसेच शिबिराचे तज्ज्ञ डॉ. वसंत कटारिया, डॉ.गजेंद्र गिरी, डॉ.रविराज गवळी,
डॉ. प्राजक्ता पारधे आदी उपस्थित होते. या शिबिरात जिल्ह्यातील रुग्णांचा प्रतिसाद मिळाला. १२० रुग्णांची तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन डॉ.आशिष भंडारी यांनी केले.तर आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.





