केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे सहकारावर परिणाम :दिलीप वळसे पाटील

घोडेगाव सहकारी संस्थेची शताब्दी
मंचर – केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुढील काळात सहकारावर मोठा परिणाम होणार आहे. यात छोट्या बॅंका, सहकारी संस्था टिकवणे हे मोठे आव्हान आहे, असे मत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला शंभर वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांचा सत्कार वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश काळे, हभप पांडुरंग महाराज येवले, कैलासबुवा काळे, सखाराम घोडेकर, सखाराम पाटील काळे, वसंत काळे, किरण घोडेकर, एकनाथ घोडेकर, अक्षय काळे, क्रांती गाढवे, सोमनाथ काळे, मंजूषा बाऱ्हाडे, रूपाली झोडगे, सुदाम काळे, तुकाराम काळे, विनोद कासार, दिनेश घुले, मार्तंड काळे उपस्थित होते.
ते म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आपल्या जुन्या लोकांनी 100 वर्षांपासून जोपासलेल्या आणि शेतकऱ्यांसाठी उपयोगात आलेल्या संस्था अडचणीत येणार आहेत. स्वातंत्र्यापूर्वी 1921 मध्ये ही सोसायटी स्थापन झाली आहे. ब्रिटिश राजवट असताना आपल्या जुन्या मंडळींनी विचार करून सोसायट्या, ग्रामपंचायती स्थापन केल्या आणि शंभर वर्षे संभाळल्या. शेतकऱ्यांचे भले करण्यासाठी समाजात एकोपा ठेवून या संस्था उभ्या केल्या. आजही वर्षाअखेरीस मिळणाऱ्या लाभांशाचा आनंद शेतकऱ्यांना मोठा असतो.





