पुण्यातील मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; ढोल-ताशाच्या गजरात देणार बाप्पाला निरोप

Pune Ganesh Visarjan 2024 | पुण्याच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. यंदाही मानाच्या आणि प्रमुख मंडळांनी विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशा पथक, बॅंड, ध्वजपथक याशिवाय विविध संस्था आणि संघटनांचा सहभाग यात आहे. नुकतेच मानाच्या तीन गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
मानाचा पहिला ग्रामदैवत कसबा गणपती आणि मानाचा दुसरा ग्रामदेवता तांबडी जोगेश्वर गणपती टिळक चौकात दाखल झाला आहे. याशिवाय तिसरा मानाचा गणपती असलेल्या पुण्याचा राजा गुरुजी तालीम गणपतीला सुर्यरथातून निरोप दिला जाणार आहे.
पुण्याचा राजाची सुर्यरथातुन मिरवणुक निघणार असुन सुर्यरथ आकर्षक फुलमाळांनी सजविण्यात करण्यात आली आहे. याशिवाय रांगोळीच्या पायघड्या आणि गुलालाची उधळण करत गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. रांगोळीच्या माध्यमातून संदेश दिला जात आहे.
View this post on Instagram
पुण्यात मागच्या काही महिन्यापूर्वी ड्रग्सचे मोठे रॅकेट सापडले होते. त्याच ड्रग्सच्या थीमवर आधारित लक्ष्मी रोडवर कला अकादमीने आगळावेगळा संदेश दिला आहे. “पुण्यात जी तरुणाई ड्रगच्या विळख्यात सापडली आहे ती बाहेर पडू दे” … पुण्यामधील जी काही संकट येतात ती देखील दूर होऊदे ,” असे या रांगोळीच्या माध्यमांतून लाडक्या गणेशला अर्चना करण्यात आली आहे.





