पाकिस्तानला IMF कडून मोठी आर्थिक मदत; भारताच्या विरोधानंतरही कर्ज मंजूर

India Pakistan War | पाकिस्तानला भारताला डिवचणं चांगलचे महागात पडले आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना कराव्या लागणाऱ्या पाकिस्तानला मित्र देशांकडे हात पसरण्याची वेळ आली आहे. यातच भारताच्या विरोधानंतर आयएमएफने पाकिस्तानला एक अब्ज डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे. अशातच आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने पाकिस्तानला काही अंशी दिलासा दिला आहे.
आयएमएफकडून (IMF) पाकिस्तानसाठी 1 अब्ज डॉलर्सच्या हप्त्याला मिळालेली मंजुरी ही महत्त्वाची असल्याचं शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. IMF च्या कार्यकारी मंडळाने पाकिस्तानसाठी ७ अब्ज डॉलर (अंदाजे ६० हजार कोटी रुपये) च्या कर्जाच्या पुनरावलोकनानंतर १.३ अब्ज डॉलरच्या पहिल्या हप्त्याला मान्यता दिली आहे. हे कर्ज २ वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आले आहे.
The International Monetary Fund (IMF) today reviewed the Extended Fund Facility (EFF) lending program ($1 billion) and also considered a fresh Resilience and Sustainability Facility (RSF) lending program ($1.3 billion) for Pakistan. As an active and responsible member country,… pic.twitter.com/qGbHJF4SeK
— ANI (@ANI) May 9, 2025
भारताचा होता विरोध
मात्र पाकिस्तानला दिला जाणारी मदत ही दहशतवादी कारवायांसाठी वापरली जाईल, असा इशारा भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला दिला होता. पाकिस्तान या निधीचा वापर दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्यासाठी करत असल्याची शक्यता भारताकडून करण्यात आली आणि त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला कर्ज देण्यास भारताने विरोध केला होता.
भारताने या बेलआउट पॅकेजच्या विरोधात आपली चिंता आणि नाराजी नोंदवली होती, परंतु IMF च्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला कर्जाचा पहिला हप्ता देण्यास सहमती दर्शवली आहे. अशा प्रकारे, पाकिस्तानला आतापर्यंत ७ अब्ज डॉलरपैकी २.३ अब्ज डॉलरचे कर्ज मंजूर झाले आहे. यापूर्वीही १ अब्ज डॉलरचे बेलआउट पॅकेज देण्यात आले होते. India Pakistan War |
पाकिस्तानच्या बेलआउट पॅकेजचा विरोध करताना भारताने याची तीन प्रमुख कारणे IMF ला सांगितली आहेत. भारताने म्हटले आहे की, १९८९ नंतर गेल्या ३५ वर्षांत पाकिस्तानने २८ वेळा IMF कडून कर्ज घेतले आहे. गेल्या ५ वर्षांतच त्यांनी ४ वेळा IMF च्या कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे. परंतु, पाकिस्तान या निधीचा योग्य वापर करत नाही. यामुळेच सातत्याने बेलआउट पॅकेज मिळूनही त्यांची अर्थव्यवस्था खालावत चालली आहे. पाकिस्तानने यापूर्वी घेतलेल्या पॅकेजचा योग्य वापर केला आहे की नाही, याची IMF ने याची चौकशी करावी, अशी मागणी भारताने केली आहे.
भारताने म्हटले आहे की, पाकिस्तानशी सुरू असलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांना IMF कडून बेलआउट पॅकेज मिळाले, तर ते याचा उपयोग लष्करी कारवाया आणि युद्ध साहित्य खरेदी करण्यासाठी करू शकतात. तरीही, IMF ने भारताच्या या सर्व चिंता बाजूला ठेवून पाकिस्तानसाठी १ अब्ज डॉलरच्या कर्जाला हिरवा कंदील दाखवला आहे. India Pakistan War |
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मानले आभार
पाकिस्तान पीएमओने जारी केलेल्या निवेदनात पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आयएमएफने पाकिस्तानसाठी १ अब्ज डॉलर्सच्या हप्त्याला मंजुरी दिल्याबद्दल आणि भारताने त्याविरुद्ध मनमानी कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या मदतीमुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारली आहे आणि देश विकासाकडे वाटचाल करेल, असेही निवेदनात म्हंटले आहे.
हेही वाचा:
पाकिस्तानचा दिल्लीवर हल्ल्याचा प्रयत्न; भारतीय लष्कराने पाकड्यांचा डाव लावला उधळून





