IMD Weather : देशात थंडीचा जोर आणखी वाढणार ; ‘या’ भागात पावसाचा अंदाज

IMD Weather : गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात (Weather Forecast) मोठा बदल झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे देशात काही भागात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. देशात काही ठिकाणी आज पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज देखील हवामान विभागले वर्तवला आहे. राज्यात मात्र आज ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून पावसाची शक्यता नाही.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘त्रिपुरा किनारपट्टी भागातील कमी दाबाचे क्षेत्र आजच्या IST 1730 तासांवर कमी चिन्हांकित झाले आहे. चक्रीवादळ समुद्रसपाटीपासून 1.5 किमी अंतरावर आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरात असलेल्या या चक्रीवादळामुळे देशातील हवामानवर परिणाम होणार आहे.
महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज नाही, पण पारा घसरणार आहे. मुंबई, पुण्यासह राज्यात आज थंडीचा कडाका वाढणार आहे. मुंबई पुण्यात पुढील 24 तासांत किमान तापमानात किंचित घट होईल, असं भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. त्यासोबतच नागपूर अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर या भागातही सकाळी आणि संध्याकाळी थंडीचा जोर वाढणार असून दुपारी आकाश स्वच्छ असेल.
आज आणि उद्या नोव्हेंबरदरम्यान तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. केरळ आणि माहे, अंदमान आणि निकोबार बेटांवर आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल या वेगळ्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 19 नोव्हेंबरला आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या भागात दाट धुक्याची चादर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. देशाच्या इतर भागात हवामानात जास्त बदल जाणवणार नाही, ढगाळ वातावरण पाहायला मिळेल.





