IMD Rainfall Prediction : राज्यासह देशात पुढील 4 दिवस पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Maharashtra Weather : सध्या अरबी समुद्रात (Arebian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. दरम्यान,यामुळे मुंबई, ठाणेसह पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, दक्षिणपूर्व बंगाल उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात 14 नोव्हेंबरपासून पावसाचा नवा टप्पा सुरू ( Weather Update ) होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, 16 नोव्हेंबरच्या सुमारास ते पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकून मध्य आणि लगतच्या बंगालच्या उपसागरावरील दबाव तीव्र होण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला.
बंगालच्या उपसागरातून ईशान्येकडील वारे दक्षिणपूर्व द्वीपकल्पीय भारतावर वाहतात. या हवामानाच्या प्रभावाखाली दक्षिण भारतातील अनेक भागांत पावसाची अपेक्षा आहे.





