भोसरीत बेकायदा बांगलादेशी महिलेचे वास्तव्य; पती, पत्नी आणि मुलाला अटक, पोलिसांची कारवाई

पिंपरी चिंचवड: गेल्या काही दिवसांपासून अवैध्यरित्या राज्यात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पुणे शहरात देखील बांगालदेशी घुसखोर बेकायदा वास्तव्य करत असल्याचे समोर आले होते. सुरुवातीला शहरातील स्वारगेट परिसरातील एका भागात पोलिसांनी धडक कारवाई करत एका बांगलादेशी घुसखोराला ताब्यात घेतले होते.
संबंधित व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून शहरात बेकायदा वास्तव्य करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. अशातच आता बांगालेदशी महिलसोबत विवाह करुन आणि तिचा पर्यटन व्हिसा संपल्यानंतर परत पाठवले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी धडक कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी भागात बांगलादेशी महिलेसोबत विवाह करून तिचा पती आणि मुलगा राहत होते. या महिलेचा पर्यटन व्हिसा संपल्यानंतर तिला परत पाठवले नाही. या प्रकरणी पती, पत्नी आणि मुलाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. भोसरी MIDC पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मोहम्मद राणा, मोहम्मद शेख नामक व्यक्तीने बांगलादेशी महिलेशी विवाह केला असल्याची माहिती आहे.





