Illegal activities : अवैध धंदे करणाऱ्यांनी मुख्य प्रवाहात यावे
Illegal activities :

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आवाहन
Illegal activities : अवैध धंदे करणाऱ्यांनी हे मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे; अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. काशेवाडी परिसरात अवैध धंदे सुरू असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असे आश्वासनही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
अखिल काशेवाडी नवरात्र महोत्सव समिती आणि क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवादरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काशेवाडी परिसराला भेट देऊन देवीची आरती केली.
या वेळी गणेश पेठ गुरुद्वाराचे प्रमुख भोलासिंग अरोरा, बालाजी मंदिराचे महंत लाल दास बैरागी उपस्थित होते. नवरात्रोत्सवाचे आयोजक तथा माजी नगरसेवक अविनाश बागवे आणि यासेर बागवे यांच्या हस्ते अमितेश कुमार यांचा सत्कार करण्यात आला.
मातंग एकता आंदोलनाचे सचिव आरुण गायकवाड, पुणे शहराध्यक्ष दयानंद आडागळे, नवरात्रोत्सवाचे प्रमुख सुनील बावकर, हुसेन शेख, सुरेखा खंडाळे, उत्सवाचे अध्यक्ष आदित्य गायकवाड, सुरेश भंडारी आदी उपस्थित होते.





