#ILeague Football : गोंजालेजची हॅटट्रिक; मोहन बागानचा विजय

नवी दिल्ली : फ्रान गोंजालेजच्या हॅटट्रिकच्या जोरावर मोहन बागान संघाने आय-लीग फुटबाॅल स्पर्धेतील सामन्यात नेरोका एफसी संघाचा ६-२ असा पराभव करत विजय नोंदविला.
FULL-TIME ⌛
An absolute belter of a match comes to an end, as @Mohun_Bagan sweep the 3⃣ points yet again 🙌
MB 6⃣-2⃣ NFC#MBNFC ⚔ #HeroILeague 🏆 #LeagueForAll 🤝 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/R0Q73N89k0
— Hero I-League (@ILeagueOfficial) February 14, 2020
मोहन बागान संघाकडून गोंजालेजने १० व्या, २४ व्या आणि ४५ व्या मिनिटाला गोल करत हॅटट्रिक साजरी केली. याशिवाय फ्रान मोरांतेने १३ व्या, बाबा दियावाराने ३६ व्या आणि अलेक्जेंडर रोमारियो जेसुराजने ७० व्या मिनिटाला गोल केला.
नेरोका एफसी संघाकडून फिलिप अद्जाहने ४१ व्या मिनिटाला तर सुभाष सिंहने ४३ व्या मिनिटाला गोल केला. या विजयासह मोहन बागान संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. दुस-या स्थानावर मिनर्वा पंजाबचा संघ आहे.




