IIT बाबा पोलिसांच्या ताब्यात; नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर…

जयपूर : जयपूर पोलिसांनी आयआयटी बाबा अभय सिंग याला ताब्यात घेतले आहे. त्याने सोशल मीडियावर आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस केले आणि जयपूरच्या रिद्धी-सिद्धी भागातील एका हॉटेलमधून त्याला ताब्यात घेतले. बाबाजवळ गांजा आणि इतर काही मादक पदार्थही सापडले आहेत.
आयआयटी बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभय सिंगने सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी दिली होती. यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. शिप्रापथ पोलिस ठाण्याचे सीआय राजेंद्र गोदारा त्यांच्या पथकासह जयपूरमधील रिद्धी-सिद्धी येथील हॉटेलमध्ये पोहोचले आणि बाबांना ताब्यात घेतले.
खोलीत सापडला गांजा
हॉटेलच्या खोलीची झडती घेतली असता पोलिसांना गांजासह इतर काही अंमली पदार्थ सापडले. यानंतर पोलिसांनी बाबांना पोलिस ठाण्यात नेले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि बाबाने आत्महत्येची धमकी का दिली हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, त्यांच्याकडे सापडलेल्या ड्रग्जच्या स्रोताचाही शोध घेतला जात आहे. बाबाविरुद्ध आधीच गुन्हा दाखल आहे का, याचाही पोलिस तपास करत आहेत.
या प्रकरणात, अभय सिंग उर्फ आयआयटीयन बाबा म्हणतात की ‘थोडासा प्रसाद (गांजा) सापडला आहे.’ मी त्यांना सांगितले की जर तुम्ही या प्रसादावर गुन्हा दाखल केला तर कुंभमेळ्यात इतके लोक तो पितात, तर त्या सर्वांना अटक करा. हे भारतात समजले जाते. या प्रकरणात एनडीपीएस कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
आयआयटी बाबाने शेअर केला व्हिडीओ
दरम्यान, आयआयटी बाबाने पोलीस रुममध्ये तपासणी करत असतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. गेल्या दोन तासांपासून तपासणी सुरु असून, पोलीस मला व्हिडीओही काढू देत नव्हते, असा आरोप त्याने केला. तो म्हणाला की, मी रात्रभर झोपलो नाही. मला नको तुमचं सनातन, मी दुसऱ्या देशात जाऊनही सनातन करु शकतो. आपले ज्ञानी लोक तुमच्याकडे ठेवा. पोलीस आज माझा वाढदिवस साजरा करत आहे.
View this post on Instagram
कोण आहे आयआयटी बाबा?
महाकुंभ गेल्या महिन्यातच संपला. पण महाकुंभामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभय अजूनही कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे. अलिकडेच, तो भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत केलेल्या भाकितामुळे चर्चेत आला होता. तो म्हणाला होता की, भारत सामना हरेल. पण, भारताने तो सामना जिंकला. यामुळे त्याला खूप ट्रोल करण्यात आले.
गेल्या शनिवारी, एका लाईव्ह शो दरम्यान झालेल्या वादामुळे तो चर्चेत आला होता. शुक्रवारी नोएडा येथे एका खाजगी वाहिनीवरील वादविवाद कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप अभय सिंग यांनी केला होता. त्याने पोलिसांकडे तक्रार केली की, काही भगवे कपडे घातलेले लोक न्यूजरूममध्ये आले आणि त्यांनी त्याच्याशी गैरवर्तन केले आणि काठ्यांनी मारहाण केली.
#WATCH | Jaipur, Rajasthan | Baba Abhay Singh aka IIT Baba, says, “I have nothing to say about it as of now. It’s my birthday, and I want to be happy today.” https://t.co/dAHkw551ZP pic.twitter.com/HDYp8CT3tk
— ANI (@ANI) March 3, 2025



