काँग्रेसला मोठा धक्का ! आमदार हिरामन खोसकर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
Updated On:

इगतपुरी : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आली आहे. आमदार हिरामन खोसकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. देवगिरी बंगल्यावर मंगळवारी अजित पावर यांच्या उपस्थितीत खोसकरांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
इगतपुरीत कॉंग्रेसला एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. विधानपरिषदेत हिरामन खोसकर यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला होता. त्यामुळे खोसकर नाराज होते. त्यानंतर आज त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे.
हिरामन खोसकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस आता काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.





