फ्रेंच ओपन टेनिस : इगा स्वेटेक ठरली विजेती
Updated On:

पॅरिस : पॅरिसमधील कोर्ट फिलीप-चॅटियर येथे झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात इगा स्वेटेकने कोको गॉफचा सरळ सेटमध्ये पराभव करून तिचे दुसरे फ्रेंच ओपन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
स्वेटेकने एक तास आठ मिनिटे चाललेल्या लढतीत गॉफचा 6-1, 6-3 असा पराभव करत सलग 35वा विजय नोंदवला. या सामन्यात अनुभवी स्वेटेकने गॉफवर वर्चस्व गाजवले. तिने सुरेख फोरहॅंड आणि बॅकहॅंड्सचा वापर करत विजय मिळवला. दरम्यान, इगा स्वेटेकने 2020 मध्ये तिचे पहिले फ्रेंच ओपन जेतेपद पटकावले होते.





