“ब्रँड तयार करायचा म्हंटलं की…” अन् वसंत मोरेंनी स्वतः बनवला चहा VIDEO

Updated On:

पुणे – मनसेचे वसंत मोरे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. विरोधक असो वा आपले कार्यकर्ते यांबाबत वसंत मोरे नेहमीच सोशल मीडियावरून भाष्य करत असतात. यामुळे नेहमीच ते चर्चेत असतात. अशात मोरे यांनी सोशल मीडियावरून स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

मोरे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते स्वतः चहा बनवताना दिसत आहेत. चहाच्या पातेल्यामध्ये दूध आणि चहा पट्टी टाकत मोरे यांना स्वतः चहा बनवला आहे. मोरेंचा हा व्हिडीओ अनेकांनी शेअर देखील केला आहे. तब्बल सत्तावीस हजार लोकांनी हा व्हिडीओ लाईक केलेला असून तब्बल पाच लाखांहून अधिकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

या व्हिडिओला मोरे यांनी मुळशी पॅटर्न चित्रपटातील ऊन..ऊन व्हटातून हे गाणं लावलेलं आहे. “ब्रँड तयार करायचा म्हंटलं ना की स्वतः झिजाव लागतं…माउंट 88 ला स्पेशल चहा बनवला…मग येताय ना चहा नाष्टा आणि रेड्डीज तंदूरची तंदूर खायला…बोपदेव घाट संपला की फक्त ५ मिनिटांवर भिवरी बोपगाव, सासवड रोड” असं कॅप्शन देऊन मोरेंनी या हॉटेलमध्ये पाहुणचार घेण्यासाठी येण्याचे आवाहन केले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune News : खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबाला सहा लाखांची नुकसानभरपाई द्या; श्रीनाथ भिमाले यांची आयुक्तांना सुचना

2026-08-23 19:55:07

Pune News : खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबाला सहा लाखांची नुकसानभरपाई द्या; श्रीनाथ भिमाले यांची आयुक्तांना सुचना

Pune News : 'द टिंबकटू कलेक्टिव्ह' आणि 'कॉज टू कनेक्ट फाउंडेशन'ला 'किर्लोस्कर वसुंधरा सन्मान' व 'वसुंधरा मित्र' पुरस्कार प्रदान

2026-08-23 12:14:50

Pune News : 'द टिंबकटू कलेक्टिव्ह' आणि 'कॉज टू कनेक्ट फाउंडेशन'ला 'किर्लोस्कर वसुंधरा सन्मान' व 'वसुंधरा मित्र' पुरस्कार प्रदान

Ambegaon News: जनक्षोभामुळे प्रशासनाची माघार! अंगणवाडी सेविका रेश्मा पारधींचे निलंबन अखेर मागे

2026-08-22 05:30:11

Ambegaon News: जनक्षोभामुळे प्रशासनाची माघार! अंगणवाडी सेविका रेश्मा पारधींचे निलंबन अखेर मागे

NCP Protest: महापालिकेत राष्ट्रवादी आक्रमक! नगरसेवकांचा निधी शून्य केल्यावरून भाजपविरोधात घोषणाबाजी

2026-08-22 05:15:36

NCP Protest: महापालिकेत राष्ट्रवादी आक्रमक! नगरसेवकांचा निधी शून्य केल्यावरून भाजपविरोधात घोषणाबाजी

Pune News : मनातील नकारात्मकतेचा विषारी विचार दूर करा आणि आनंदी जीवन जगा : डॉ. बी. के. शक्तीराज

2026-08-21 07:34:32

Pune News : मनातील नकारात्मकतेचा विषारी विचार दूर करा आणि आनंदी जीवन जगा : डॉ. बी. के. शक्तीराज