आमदार असावा तर असा.! ना अंगावर चादर, ना डोक्याखाली उशी; कोविड सेंडरमध्येच झोपले निलेश लंके

मुंबई – भारतामध्येही दिवसागणिक कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव वाढत आहे. या भयानक महामारीने देशात नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत अनेक नागरिक या विषाणूच्या विळख्यात सापडेल असून, काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत.
अश्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने अहमदनगरमध्ये दोन ठिकाणी 1000 बेडचे सुसज्ज कोव्हिड सेंटर उभे केलेले आहे. त्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी पौष्टिक नाश्ता आणि जेवणासोबतच करमणुकीच्या साधनांचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांच्या याच कार्यामुळे निलेश लंके गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चेत आहे.
कोरोना रुग्णांची पूर्णपणे काळजी घेता यावी म्हणून निलेश लंके यांनी कोविड सेंटरमध्येच मुक्काम ठोकला आहे. सध्या त्यांचा कोविड सेंटर मधील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये निलेश लंके कोणताही बडेजाव न मिवरता गरीब आणि सामान्य लोकांमध्ये झोपल्याचे दिसत आहेत.
अंगवार काहीही नसताना ते शांतपणे झोप घेताना दिसतायत. त्यांच्या आजूबाजूला नागरिक आराम करत आहेत. लंके यांच्या आजूबाजूला झोपलेले हे नागरिक कोरोनाग्रस्त आहेत की नेमके कोण हे सांगणे कठीण आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुद्धा लंके यांच्या या कामाचे कौतुक केले आहे.
निलेश लंके आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणतात कि, “अहोरात्र आपल्याच लोकांच्या साठी काम करणारं ही आपली जबाबदारी असते. आपली माणसं अडचणीत आहेत, उपचार असेल, इंजेक्शन असेल, किंवा अजून काही आरोग्याची समस्या असेल तर सगळ्या सुविधा तत्काळ उपलब्ध झाल्या पाहिजेत हा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. मी स्वतः जास्तीत जास्त वेळ कसा देऊ शकतो हाच माझा कायम प्रयत्न राहिलेला आहे..!’ या आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.





