“तुम्ही मतदान केले तर त्याचा…” ; अशोक चव्हाण यांचे मतदारांना आवाहन

राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघात आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यासाठी सर्वजण मतदान करताना दिसून येत आहेत. त्यातच भाजप नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी देखील मतदान केले. यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
नांदेडमध्ये भाजप नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण म्हणतात, “… हा लोकशाहीचा सर्वात मोठा सण आहे, मी जनतेला सहकार्य करून मतदान करण्याचे आवाहन करतो. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. तुम्ही मतदान केले तर त्याचा चांगला फायदा होईल. मजबूत सरकार सत्तेवर येईल.”असे त्यांनी मतदानानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले.
#WATCH | Voting on all 288 assembly constituencies and Nanded Lok Sabha by-elections taking place today.
In Nanded, BJP leader & Rajya Sabha MP Ashok Chavan says, “…This is the biggest festival of democracy, I appeal to the people to cooperate and vote. Voting is our duty. If… pic.twitter.com/p3scZWvrgX
— ANI (@ANI) November 20, 2024
दरम्यान, राज्यात एकूण 4 हजार 136 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. तर शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, पक्ष फुटीनंतर राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणूका पार पडत आहेत. यासाठी गेल्या महिनाभरापासून राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला होता. यातच आता महायुती आणि महाविकास आघाडीनेही कंबर कसल्याचं दिसून आले.





