Sanjay Raut : “भांग मारली की…..”; रामदास कदमांच्या खळबळजनक दाव्याला संजय राऊतांचे चोख प्रत्युत्तर

Updated On:
Sanjay Raut : “भांग मारली की…..”; रामदास कदमांच्या खळबळजनक दाव्याला संजय राऊतांचे चोख प्रत्युत्तर

Sanjay Raut | Ramdas Kadam | ५ जुलै या दिवशी ‘ठाकरे बंधू’ विजयी मेळाव्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. वरळीतील डोम सभागृहात या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली होती.

तसेच राज ठाकरेंना मारण्याचा कट होता, असा खळबळजनक दावाही रामदास कदम यांनी केला आहे. त्यांनी हा दावा एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. त्यांनी केलेल्या टीकेला आणि दाव्याला उबाठाचे नेते संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी उद्याच्या मेळ्यासाठी काय ठरलं आहे, हे उद्या समजेल असे सूचक विधानही केले आहे.

भांग मारली की..

कोण आहेत ते असे म्हणत राऊतांनी कदमांना फटकारले. मूळात शिवसेनेतील जूने सहकारी सोडून गेलेले आहेत, त्यांच्या पोटात आता भीतीचा गोळा उठलेला आहे, आणि त्या भयातून अशी वक्तव्य केली जात आहेत. आता रामदास कदम काय बोलताहेत आणि आणखी कोण काय बोलतय हे सुरूच राहणार, मराठी मुद्याच्या निमित्ताने उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले असतील, तर ही काही पाच पंचवीस टाळकी आहेत, त्यांना हे दोघे एकत्र आलेले नको आहोत, असे राऊत म्हणाले. चारण्याची भांग मारली की खूप कल्पना सुचतात अशा शब्दांत रामदास कदमांना संजय राऊतांनी सुनावलं आहे. अशी स्पप्न पडतात तशी त्यांनाही स्वप्न पडत असल्याचे राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

काय म्हणाले होते रामदास कदम ?

आम्ही कणकवलीला चाललो होतो त्यावेळेला आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तुम्ही रस्ता बदला… राज ठाकरे यांच्या घातपाताचा प्लॅन होता, आणि माझ्या माहितीप्रमाणे आणि राज साहेबांच्या माहितीप्रमाणे तो प्लॅन उद्धव ठाकरे यांनीच केला होता असा खळबळजनक दावा रामदास कदम यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंवर घाणाघात 

५ जुलै रोजी ठाकरे बंधू हिंदी सक्तीच्या मुद्यावर एकत्रित एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या विजयी मेळाव्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यावर सत्ताधारी विशेष करून शिंदे सेनेतील नेत्यांकडून टीका केली जात आहे. याच अनुषंगाने माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत उद्धव ठाकरे हा आतल्या गाठीचा माणूस दाखवायचा चेहरा वेगळा आहे, अशी घणाघाती टीका केली आहे.

हेही वाचा : देशविरोधी व्हायरल व्हिडिओ अन् कंटेंट होणार ब्लॉक ; सरकार आणणार राष्ट्रीय धोरण, गृह मंत्रालयाच्या हालचाली

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar, Raj Thackeray: “नानांनी काही गोष्टी ॲडजस्ट केल्या असत्या तर…” राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

2026-10-08 13:35:12

Nana Patekar, Raj Thackeray: “नानांनी काही गोष्टी ॲडजस्ट केल्या असत्या तर…” राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

2026-10-07 22:53:07

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

2026-10-07 22:22:29

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद