‘40 वर्षांपेक्षा कमी वय असेल तर त्वरित देश सोडा’, तरूणीने केले आवाहन; नक्की कारण काय?

चांगल्या सोयीसुविधा, राहणीमान, करिअरच्या संधी यामुळे विविध देशातील नागरिक त्यांचा देश सोडून ब्रिटनमध्ये स्थायी होतात. मात्र, आता एका इन्फ्लुएन्सरने लोकांना ब्रिटिनच सोडण्याचे आवाहन केले आहे. तुमचे वय जर 40 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्वरित ब्रिटन सोडावे, अशी विनंती करणार ब्रिटिश सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. देश का सोडावा? याची कारणे देखील या इन्फ्लुएन्सरने दिली आहेत.
40 वर्षांखालील श्रीमंत लोकांनी ब्रिटन सोडून दुसरीकडे स्थायिक व्हावे, असे आवाहन ‘प्रूडिशफिश’ नावाच्या ब्रिटिश इन्फ्लुएन्सरने नागरिकांना केले आहे. देश का सोडावा? यासाठी तिने आकडेवारी देखील दिली. 2024 मध्ये 10,800 कोट्याधीशांनी ब्रिटन सोडल्याचा दावा तिने केला आहे. तिचा हा व्हीडिओ आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी बघितला आहे.
View this post on Instagram
यूकेमध्ये दिवसेंदिवस वाढणारी महागाई व समस्यांची माहिती देत चांगल्या भविष्यासाठी यूके सोडून दुसऱ्या देशात जाऊन स्थायिक होण्याचा सल्ला तिने दिले आहे. दरवर्षी देश सोडून दुसऱ्या देशांत स्थायिक होणाऱ्या श्रीमंत व्यक्तींची संख्या वाढत असल्याचे तिने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
या व्हीडिओमध्ये अनेक रिपोर्टचा संदर्भ देण्यात आला आहे. WealthBriefing.com नुसार 2024 मध्ये 10,800 कोट्यधीशांनी यूके सोडले आहे. हा आकडा कोणत्याही देशातून बाहेर जाणाऱ्यांमध्ये सर्वाधिक आहे. ब्रिटननंतर देश सोडणाऱ्यांमध्ये चीनच्या नागरिकांचा दुसरा क्रमांक आहे.





