Yugendra Pawar | मागील दोन्ही निवडणूकीत कार्यकर्त्यांनी आम्हाला मोठी साथ दिली. आमच्याकडे ना संस्था आहेत, ना सत्ता ना पैसा आहे. तरीही पक्षफूटीनंतर कार्यकर्ते सोबत राहतात ही सोपी गोष्ट नाही. कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आम्हाला ठामपणे त्यांच्यामागे उभे राहावे लागेल. सक्षम उमेदवार मिळत असतील तर आणि माळेगावचा छत्रपती होवू द्यायचा नसेल, तर निवडणूक लढवावी लागेल, असा निर्धार राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला. यामुळे माळेगांंव कारखाना निवडणुकीत त्यांनी राजकीय आखाड्यात शेड्डू ठोकल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीपाठोपाठ ‘माळेगांव’च्या राजकीय आखाड्यात पुन्हा पवार विरुध्द पवार लढती रंगणार असल्याचे संकेतच त्यांनी आपल्या भाषणात दिले आहेत बारामती दौऱ्यात शनिवारी माळेगावचे काही सभासद शरद पवार यांना भेटले, याविषयी युगेंद्र पवार यांना विचारणा करण्यात आली. या प्रश्नावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, शरद पवार यांच्याकडे सभासद नेहमीच वेगवेगळे प्रश्न घेऊन येत असतात, असे त्यांनी सांगितले. माळेगावाचे अध्यक्ष केशवराव जगताप यांनी आंदोलनाव केलेल्या टीकेचा युगेंद्र पवार यांनी समाचार घेतला. ते आंदोलन आमच्या पक्षाचे नव्हते तर आंदोलनात आम्ही पाठिंबा दिला होता. असे त्यांनी सांगितले. सर्वपक्षीय सभासद आंदोलनात होते. त्यात माळेगावच्या अध्यक्षांनी राजकारण आणू नये, असे युगेंद्र पवार यावेळी बोलताना म्हणाले. बारामतीमधील पत्रकारांशी संवाद सांधताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. कामगारांचे पगार वेळेवर मिळत नाहीत, रसायनयुक्त पाणी नदीत सोडले जात आहे, ऊसाला योग्य दर दिलेला नाही, कधी तरी एकदा चांगला दर दिला तेच सातत्याने सांगितले जात आहे, आदी प्रश्नांवर त्यांनी भाष्य केले. पुढे ते म्हणाले मग छत्रपतीनेही १५ वर्षांपूर्वी चांगला दर दिला होता, तेच सांगायचे का, असा सवालही युगेंद्र पवार यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. मी बोलायला लागलो तर जड जाईल माळेगावचे अध्यक्ष माझ्या शरयू कारखान्याच्या दराबाबत बोलले. माझा कारखाना ज्या तालुक्यात आहे, तिथे आम्ही क्रमांक एकचा दर देत आहोत. तो सहकारी नव्हे तर खासगी कारखाना आहे. कर्ज काढून मी तो कष्टाने चालवत आहे. त्यांचे (केशवराव जगताप यांच्या नेत्यांचे) सात-आठ खासगी कारखाने आहेत. मी जर बोलायला लागलो तर मग त्यांना ते जड जाईल, असा इशाराच युगेंद्र पवार यांनी यावेळी बोलताना दिला.